"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

1.   गावाविषयी माहिती

रुईघर हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  पदस्पर्शाने पावन झालेले  प्रगतशील व ऐतिहासिक जव्हार तालुक्यातील  गाव आहे. रुईघर बोपदरी गावात गावदेवी  मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २३३६ आहे. ग्रामपंचायत मधील गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ३, अंगणवाडी केंद्रे ७ , प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व व्यायामशाळा १,सभामंडप-३ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच  ग्रामपंचायत मधील गावात रुईघर गाव सेजारी वाग नदी अशी महत्वाची ठिकाणे असुन तसेच १  मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा गावदेवी ची विविध ठिकाणे अशे धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

 

2.   गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ती हंगामी शेती असुन खरीप हंगामातील भात,नागली,वरी, तुर,उडीद,खुरसणी,कुळीद ही प्रमुख पिके घेतली जातात. भात आणि आंबा, या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते, तसेच दुग्ध व्यवसाय करतात

3.   रुईघर बोपदरी ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रुईघर गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व १० सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

2. भौगोलिक स्थान

रुईगार /बोपदरी  हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ४२ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ २१३ चौ. किमी हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये २ वार्ड आहेत. एकूण ८२० कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या २३३६आहे. त्यामध्ये ११६७ पुरुष  ११६९ महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने चढ उतार प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन कमी प्रमाणात आहे. तसेच गावालगत वाग नदी आहे येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी २३०० मीमी पर्जन्यवृष्टी होते.

 3. लोकजीवन

रुईघर बोपदरी  गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून भात,नागली,वरी, तुर,उडीद,खुरसणी,कुळीद व हंगामी आंबा, काजु  पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. मखर,माउली,साथी असे आदिवासी सन तसेच हिंदु सन गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

रुईघर बोपदरी ग्रामपंचायत च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

5. संस्कृती परंपरा

रुईघर बोपदरी गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावात वर्षा दिवाळी अगोदर माउली तसेच भात कापणी नंतर साथी हे सन महत्वाचे असुन या सणांना गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व सप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे सोनगाव गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

 . जवळची गावे

गाव जव्हार तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे रुईघर बोपदरी  गावासी  सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

रुईघर बोपदरी ग्रामपंचायट मध्ये येणारी गावे मूळ गावे २ रुईघर /बोपदरी बोपदरी मध्ये येणारी गाव व पडे चंदोशी ,गोंडपाडा, ढाकणपाडा, पाचबुड, बोकुडरान ,आसपासची प्रमुख गावे व पाडे आहेत.

ग्रामपंचायत रुईघर, जव्हार

रुईघर हे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. जव्हार तालुका हा प्रामुख्याने आदिवासी भाग असून येथील अनेक गावे अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. रुईघर गावाच्या विशिष्ट विकासाबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे: सद्यस्थिती आणि विकास आव्हाने भौगोलिक स्थान: रुईघर हे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात वसलेले एक महसूल गाव आहे. हे गाव गुजरात आणि दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेशांच्या सीमेजवळ आहे. विकासाची प्रतीक्षा: जव्हार तालुक्यातील अनेक गावांप्रमाणेच रुईघर हे देखील मूलभूत सुविधांपासून काही प्रमाणात वंचित आहे. येथे आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या विकासाची आवश्यकता आहे. लोकसंख्या आणि भाषा: २०११ च्या जनगणनेनुसार, रुईघरची लोकसंख्या ७९३ होती. येथील मुख्य भाषा मराठी आहे. झालेले आणि नियोजित विकास प्रकल्प पायाभूत सुविधा: सिंचन आणि पाणीपुरवठा: जव्हार शहराला आणि आसपासच्या गावांना खळखड धरण आणि जयसागर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. रुईघर गावाच्या परिसरात जलसंधारणाचे प्रयत्न सुरू आहेत. रस्ते: जव्हार-जामसर-चलतवाड-खांबला-सेल्वासा रस्त्याच्या सुधारणेचा एक प्रकल्प प्रस्तावित होता, ज्याचा खर्च १३.३० कोटी रुपये होता. यामुळे रुईघर आणि आसपासच्या परिसरातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत झाली असेल. गृहनिर्माण: बेघर आणि कच्ची घरे असलेल्या गरजू कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र आणि राज्य पुरस्कृत गृहनिर्माण योजना (उदा. रमाई आवास योजना) राबविण्यात येतात. लाभार्थींची निवड सामाजिक-आर्थिक आणि जात सर्वेक्षण २०११ च्या आधारे केली जाते. शेती आणि उपजीविका: शेती विकास: या भागातील शेतीत सुधारणा करण्यासाठी विविध कृषी उपक्रम राबवले गेले आहेत. भात पिकाव्यतिरिक्त, हरभरा, आंबा, पेरू आणि काजू यांसारख्या फळबाग लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच, हंगामी भाजीपाला लागवडीलाही चालना दिली जात आहे. कौशल्य विकास: आयआयटी मुंबईसारख्या संस्थांनी या भागातील आदिवासी महिला आणि पुरुषांना मास्क आणि पीपीई किट बनवण्याचे प्रशिक्षण देऊन उपजीविका निर्मितीमध्ये मदत केली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या योजनांची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर मिळू शकते. (रुईघर गाव पालघर जिल्ह्यात असले तरी, प्रशासकीय योजनांची माहिती संबंधित जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असते). जव्हार तहसील संबंधित अधिक माहिती पालघर जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. रुईघरमधील विकासासाठी सरकारी योजना आणि स्थानिक पातळीवरील उपक्रम सुरू आहेत, परंतु या आदिवासीबहुल भागात सर्वांगीण विकासासाठी आणखी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

प्रशासकीय संरचना



भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


820
2336
1167
1169

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo